अंबादास दानवे यांचा हल्लाबोल…संजय शिरसाट यांची ‘ती’ इच्छा अपूर्ण राहणार, तर शिवसेनेला 2 जागाही मिळणार नाहीत!
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही, शासन आपल्या दारीवरून अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. संजय शिरसाट यांची मंत्री व्हायची इच्छा पूर्ण होणार नाही, तसेच लोकसभेत शिवसेनेला जागाही मिळणानर नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही, शासन आपल्या दारीवरून अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे. संजय शिरसाट यांची मंत्री व्हायची इच्छा पूर्ण होणार नाही, तसेच लोकसभेत शिवसेनेला जागाही मिळणानर नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. “संभाजीनगरला मंत्रीपद देणं हे लॉलीपॉप दिल्यासारखं आहे.मुळात मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही हाच प्रश्न आहे. आजही 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही. संजय शिरसाट यांची मागील 10 वर्षापासूनची सुप्त इच्छा या पंचवार्षिकमध्ये पूर्ण होईल असे मला वाटत नाही”, असं दानवे म्हणाले. दरम्यान शिवसेनेला भाजपाबरोबर जाताना 2 जागा देखील मिळणार नाहीत हे लिहून घ्या, असंही अंबादास दानवे म्हणाले.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

