AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve | अटल सेतूपासून Missing Link पर्यंत...पावसाने सरकारचे वाभाडे काढले; सरकारच्या प्रकल्पांवर दानवेंचा सणसणीत वार

Ambadas Danve | अटल सेतूपासून Missing Link पर्यंत…पावसाने सरकारचे वाभाडे काढले; सरकारच्या प्रकल्पांवर दानवेंचा सणसणीत वार

| Updated on: Jul 07, 2026 | 1:13 PM
Share

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. या घटनेवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचे गंभीर आरोप केले.

माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “१ मे रोजी सुरू झालेल्या या मिसिंग लिंक प्रकल्पाला अवघे ६० ते ६५ दिवस झाले आहेत. अटल सेतूची जी परिस्थिती झाली, सागरी मार्गाची जी अवस्था झाली, तीच परिस्थिती आता मिसिंग लिंकचीही झाली आहे. खऱ्या अर्थाने या पावसाने राज्य सरकारचे वाभाडे काढले आहेत.”

पुढे बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधत, “आता सरकार कोणतीही मखलाशी करेल, गोलमोल उत्तरे देईल. मात्र हा जनतेच्या जीवाशी खेळ आहे. भ्रष्टाचाराला आणि ठेकेदारांना पोसणारे धोरण राज्य सरकार राबवत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे,” असा आरोप केला.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनाने तातडीने मातीचा ढिगारा हटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. मात्र, या घटनेनंतर प्रकल्पाच्या दर्जा, सुरक्षा आणि नियोजनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.

Published on: Jul 07, 2026 01:13 PM

Follow Us