Ambernath Accident : शिंदेंच्या उमेदवाराच्या कारचा अपघात, 4 मृत्यू; सभेसाठी जाताना अंबरनाथ फ्लायओव्हरवर घडलं काय?
अंबरनाथमध्ये शिंदे गटाच्या शिवसेना उमेदवार किरण चौबे यांच्या कारला भीषण अपघात झाला. अंबरनाथ फ्लायओव्हरवर झालेल्या या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, ज्यात चालक लक्ष्मण शिंदे, पादचारी आणि पालिकेचे दोन कर्मचारी होते. हृदयविकाराच्या झटक्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. चौबे जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अंबरनाथमध्ये शिंदे गटाच्या शिवसेना उमेदवार किरण चौबे यांच्या गाडीचा अंबरनाथ फ्लायओव्हरवर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उमेदवार किरण चौबे जखमी झाल्या आहेत. किरण चौबे बुवापाडा येथून नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, अंबरनाथ पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या पुलावर हा अपघात घडला. गाडीत बसलेल्या किरण चौबे सभेसाठी जात असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे चालक लक्ष्मण शिंदे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित कारने अनेक दुचाकींना धडक दिली.
या अपघातात चालक लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महापालिकेचे दोन कर्मचारी आणि एक पादचारी यांचा मृत्यू झाला. तर इतर तीन जण जखमी झाले. किरण चौबे यांना तातडीने कल्याण येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

