Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी हत्येचा कट, 8647 कोड जारी… नेमका अर्थ काय, कोणाचा होता प्लान?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण समोर आले आहे. ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड ८६४७ जारी करण्यात आला होता. जेम्स कोमी यांनी अलिकडेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचे आवाहन केले. ते माजी एफबीआय संचालक होते आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बहुतेक काळ माफिया आणि गुंडांवर खटला चालवण्यात घालवला होता. एक माणूस म्हणून त्यांना ते काय करत आहेत हे चांगलेच माहित होते आणि कायद्याच्या पूर्ण ताकदीखाली त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असं गबार्ड म्हणाल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी हत्येचा कट रचण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी ‘कोड 8647’ जारी करण्यात आला होता. अमेरिकेची सिक्रेट सर्व्हीस आणि एफबीआयकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, एफबीआयच्या एका माजी संचालकाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी हत्येचा कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 86 हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कोड ठरवण्यात आला होता तर 47 म्हणजे ट्रम्प हे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहे. माजी एफबीआय संचालक जेम्स कोमी यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांनाच यासाठी जबाबदार धरून तुरूंगात टाकलं पाहिजे असं अमेरिकेचे नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर (राष्ट्रीय गुप्तचर संचालक) तुलसी गबार्ड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गुप्तचर सेवा आणि एफबीआय करत आहेत. प्रत्यक्षात, माजी एफबीआय संचालकांवर ट्रम्पच्या हत्येचा कट रचल्याचा संशय आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

