AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Lal Quila Blast : दिल्लीत खळबळ! अमित शहांकडून सर्वात मोठी अपडेट,  I-20 कारमध्ये स्फोट अन्... लाल किल्ला परिसरात घडलं काय?

Delhi Lal Quila Blast : दिल्लीत खळबळ! अमित शहांकडून सर्वात मोठी अपडेट, I-20 कारमध्ये स्फोट अन्… लाल किल्ला परिसरात घडलं काय?

| Updated on: Nov 10, 2025 | 10:06 PM
Share

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि एनआयए (NIA) तपास करत आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, तर मुंबईतही सतर्कता बाळगण्यात आली आहे.

या स्फोटामागे दहशतवादी हल्ल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे, त्यामुळे तपास यंत्रणांनी कसून चौकशी सुरू केली आहे. दिल्ली पोलीस, फॉरेन्सिक टीम, एनआयए (NIA) आणि क्राईम ब्रांचची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. स्फोटासाठी नेमके काय वापरले गेले, हे शोधण्यासाठी अवशेष गोळा केले जात आहेत. स्फोट झालेल्या इको व्हॅनचा नंबर शोधण्याचे काम सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुप्तचर विभागाच्या (IB) प्रमुखांसोबत या घटनेबाबत चर्चा केली आहे. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये विशेष पथकांनी छापे टाकले असून, एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Published on: Nov 10, 2025 10:06 PM