“मग मी हॉटेलवर आलो आणि कळलं…”, टोलनाक्यावर नेमकं काय घडलं? अमित ठाकरे यांनी सांगितला घटनाक्रम
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मोठा राडा झाला.या वादावर आता अमित ठाकरे यांची बाजू समोर आली आहे.
सिन्नर, 24 जुलै 2023 | मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मोठा राडा झाला. सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांना थांबून ठेवल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला. या वादावर आता अमित ठाकरे यांची बाजू समोर आली आहे. ते म्हणाले की, “टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती. मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला.”
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

