अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड राहिलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं निलंबन
अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड राहिलेले जितेंद्र शिंदे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर जितेंद्र शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विनापरवानगी दुबई आणि सिंगापूरला गेल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. पत्नीच्या नावे सुरक्षा कंपनी स्थापन केल्याचाही शिंदे यांच्यावर आरोप आहे.
अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड राहिलेले जितेंद्र शिंदे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर जितेंद्र शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विनापरवानगी दुबई आणि सिंगापूरला गेल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. पत्नीच्या नावे सुरक्षा कंपनी स्थापन केल्याचाही शिंदे यांच्यावर आरोप आहे. जितेंद्र शिंदे मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहेत. ते 2015 पासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून नियुक्त होते. अमिताभ बच्चन यांना X category या दर्जाची सुरक्षा आहे. त्यामुळे दोन कॉन्स्टेबल कायम त्यांच्यासोबत असतात. जितेंद्र शिंदे हे रितसर अर्ज करुन किंवा आपल्या वरिष्ठांना न देता चार ते पाच वेळा दुबई आणि सिंगापुरला गेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सुट्टीवर बाहेर जाताना खोटी माहिती दिली आहे. या चौकशीमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलंय.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

