Sanjay Raut यांच्या आरोपांवर Amol Kale यांचं स्पष्टीकरण
मी सरकारचं कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. तसेच माझ्याबाबतचा सर्व तपशील आयटीच्या विवरणात दिलेलं आहे, असं सांगतानाच मी परदेशात पळून गेल्याची काही लोकांनी अफवा पसरवली आहे. ज्यांनी ही अफवा पसरवली त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
नागपूर: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी अमोल काळे (amol kale) यांच्यावर आरोप केले होते. काळे आणि भाजपचं साटंलोटं असून त्यांनी घोटाळे (scam) केल्याचाही आरोप करण्यात आला होता. काळे हे परदेशात पळून गेल्याचा दावाही काही राजकीय नेत्यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर काळे यांनी थेट टीव्ही9 मराठीकडे खुलासा पाठवला आहे. मी एक खासगी व्यावसायिक आहे. मी सरकारचं कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. तसेच माझ्याबाबतचा सर्व तपशील आयटीच्या विवरणात दिलेलं आहे, असं सांगतानाच मी परदेशात पळून गेल्याची काही लोकांनी अफवा पसरवली आहे. ज्यांनी ही अफवा पसरवली त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
