Amol Kolhe | पुणे विमानतळावर पेशवाईची चित्र दिसतात पण शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही?: अमोल कोल्हे
राष्ट्रवादी कांग्रेसचे (NCP) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला ट्विटरवरुन काही प्रश्न विचारले आहेत.
राष्ट्रवादी कांग्रेसचे (NCP) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला ट्विटरवरुन काही प्रश्न विचारले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्जिकल स्ट्राईक केलेला लाल महालसुद्धा पुण्यात आहे, अशी आठवण त्यांनी करुन दिली आहे. पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
खासदार अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय?
पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी.१/२ pic.twitter.com/eLOrOQ2497
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 3, 2021
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

