शिंदे गटाच्या आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध, मिटकरींचा गंभीर आरोप

अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना जेवणातून गुंगीचे औषध दिले जात असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.

अजय देशपांडे

|

Jun 25, 2022 | 7:30 AM

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. हे सर्व राजकीय नाट्य सुरू असतानाच आता अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केला आहे. गुवाहाटीमध्ये ज्या आमदारांना ठेवण्यात आले आहे, त्यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले जात असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.

 

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें