Amravati Violence | अमरावतीत आंदोलनाला हिंसक वळण, दुकानांवर, वाहनांवर दगडफेक

त्रिपुरातील घटनेचे आज दुसऱ्या दिवशीही अमरावतीत तणाव आहे. भाजपने अमरावती बंदची हाक दिलेली असतानाच आज शेकडो तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली. अनेकजण तोंडाला रुमाल बांधून आले होते. तर काहींच्या हातात काठ्या होत्या.

त्रिपुरातील घटनेचे आज दुसऱ्या दिवशीही अमरावतीत तणाव आहे. भाजपने अमरावती बंदची हाक दिलेली असतानाच आज शेकडो तरुणांनी रस्त्यावर उतरून जोरदार दगडफेक केली. अनेकजण तोंडाला रुमाल बांधून आले होते. तर काहींच्या हातात काठ्या होत्या. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत या तरुणांनी तोडफोड केल्याने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्रिपुरातील घटनेच्या काल मुस्लिम समुदायांनी अमरावतीत आंदोलन केलं होतं. मुस्लिमांनी दगडफेक केल्याने अमरावतीत तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती. त्यानंतर भाजपने या घटनेचा निषेध म्हणून आज अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र, आज सकाळी राजकमल चौक आणि गांधी चौकात अचानक शकेडो तरुण जमले. तोंडाला रुमाल आणि हातात काठ्या घेऊन आलेल्या या तरुणांनी संपूर्ण परिसरात जोरदार दगडफेक केली. या जमावाने दुकानांचीही तोडफोक करत जबरदस्तीने दुकाने बंद केली. हल्ला करणारे तरुण जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत असले तरी हे तरुण कोण होते हे समजू शकले नाही. आंदोलकांचा कोणत्या पक्षाशी संबंध आहे का हेही समजू शकले नाही.

Published On - 4:36 pm, Sat, 13 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI