AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन् तिघांसोबत भयंकर घडलं!

अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन् तिघांसोबत भयंकर घडलं!

| Updated on: May 17, 2026 | 5:09 PM
Share

बेतुल जिल्ह्यात भीषण रस्ते अपघात घडला, ज्यात ब्रेक निकामी झाल्याने भरधाव कार ३५ फूट खोल विहिरीत कोसळली. अमरावती येथील तीन तरुण जखमी झाले असून, त्यांना गावकरी व १०८ रुग्णवाहिकेच्या पथकाने धाडसाने बाहेर काढले. वेळेवर केलेल्या बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जखमींवर भैंसदेही येथे उपचार सुरू आहेत.

सध्या देशभरात वाहन अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे अपघात बहुतेकदा बेजबाबदारपणामुळे किंवा वेग अनावर झाल्यामुळे होतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या बेतुल जिल्ह्यात भीषण रस्ते अपघात घडला, ज्यात ब्रेक निकामी झाल्याने भरधाव कार ३५ फूट खोल विहिरीत कोसळली. अमरावती येथील तीन तरुण जखमी झाले असून, त्यांना गावकरी व १०८ रुग्णवाहिकेच्या पथकाने धाडसाने बाहेर काढले. वेळेवर केलेल्या बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जखमींवर भैंसदेही येथे उपचार सुरू आहेत.

देव तारी त्याला कोण मारी.. अशी म्हण आहे. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव बेतुलमध्ये 3 तरूणांनाआला. भरधाव वेगाने जाणारी कार 35 फूट विहीरात कोसळल्यावर मृत्यू समोर दिसत होता, मात्र सुदैवाने त्या तीनही तरूणांचा जीव वाचला. गावकऱ्यांनी मदतीसाठी तातडीने धाव घेत त्यांना वाचवलं, मात्र ते तिघे जखमी असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. या भयानक अपघाताची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

यानंतर 108 रुग्णवाहिकेचे ईएमटी (EMT) दीपक बारस्कर आणि पायलट मोहित चाडोकर यांनी विहिरीत उतरून धाडस दाखवत त्या तरुणांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गावकऱ्यांच्या मदतीने, मोठ्या प्रयत्नांनंतर तिन्ही जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रथमोपचार देऊन भैंसदेही येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले, तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिघेही बरेच जखमी झाले आहेत.

Published on: May 17, 2026 05:09 PM
Follow Us