CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत राज्याच्या राजकारणात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत राज्याच्या राजकारणात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. तसेच फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुचक प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील वर्णीबाबत विचारताच त्यांनी थेट उत्तर दिले, त्या म्हणाल्या, “नाही… नाही… मला महाराष्ट्रातच राहायचं आहे, त्यामुळे मी त्यांनाही महाराष्ट्रातच ठेवणार”. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विविध चर्चांच्या उधाणा दरम्यान त्यांनी दिलेल्या या उत्तरावर आता राजकीय प्रतिक्रिया येण्याच्या शक्यता आहेत.
Published on: Jul 25, 2026 11:19 AM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर

