हाती मशाल अन् १५ किमी अनवाणी प्रवास, उद्धव ठाकरे यांचा कोण आहे ‘तो’ निष्ठावंत शिवसैनिक?
VIDEO | महाविकास आघाडीच्या दुसऱ्या नागपूर येथील 'वज्रमूठ' सभेसाठी हातात मशाल आणि १५ किलो मीटरचा अनवाणी प्रवास; ठाकरेंचा निष्ठावंत सभास्थळी दाखल
नागपूर : नागपुरमध्ये होत असलेल्या उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सभेसाठी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका लहानशा गावातून एक निष्ठावंत उद्धव ठाकरे यांचा चाहता १५ किलोमीटरवरून अनवाणी पायाने हातात मशाल घेऊन चालत नागपूरच्या सभास्थळी दाखल झाला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला जालना येथून अंकुश पवार हा शिवसैनिक मशाल घेऊन नागपुरात दाखल झाला असल्याने त्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू आहे. तर अजनी रेल्वे स्टेशन ते सभास्थळ 15 किमी अनवाणी पायाने प्रवास करत हा निष्ठावान शिवसैनिक या सभेसाठी हजर झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मविआच्या सभेसाठी देखील हा निष्ठावान तब्बल साठ किलोमीटरवरून अनवाणी उपस्थित झाला होता. यावेळी चंद्रकांत खैरे यांनीही हात जोडत या कार्यकर्त्याला मी नतमस्तक होतो, अशी प्रतिक्रिया दिली होती.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

