AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावरान आंबा टिकवण्यासाठी ध्येयवेड्या अधिकाऱ्यानं गेल्या दहा वर्षांपासून जोपासला असाही छंद

गावरान आंबा टिकवण्यासाठी ध्येयवेड्या अधिकाऱ्यानं गेल्या दहा वर्षांपासून जोपासला असाही छंद

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 31, 2023 | 7:01 AM
Share

VIDEO | गावरान आंब्याची झाडं लावण्याचा छंद, बुलढाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागात ध्येयवेड्या

बुलढाणा :  बुलढाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका ध्येयवेड्या अधिकाऱ्यानं गावरान आंब्याच्या झाडाखालील किंवा घरातील आंबे खाल्यानंतर त्या बीया जमा करून त्यापासून गावरान आंब्याची रोप तयार करण्याचा छंद मागील दहा वर्षांपासून जोपासला आहे. एव्हढेच काय हा संपूर्ण खर्च ते स्वतःच्या खिशातून करतात, तर काही त्यांच्या सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा याला हातभार लावला असल्याचे हा ध्येयवेड्या अधिकारी सांगतो. बुलढाणा च्या सार्वजनिक बांधकाम  विभागातील उपकार्यकारी अभियंता असलेले व्ही पी देशमुख हे मागील दहा वर्षांपासून नामशेष होत चाललेल्या गावरान आंब्याची रोपे तयार करून ते शाळा, ग्रामपंचायत, मंदिर परिसर किंवा रस्त्यावर ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी ती रोपे  लावण्यासाठी देतात. तसा एका फलक उप कार्यकारी अभियंता देशमुख यांनी त्यांच्या कार्यालयात लावला असून तो या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो. देशमुख यांनी त्या फलकाच्या माध्यमातून आवाहन केलेय की , सध्या आंबा खाण्याचे दिवस असून आपण आंबा खाल्ल्यावर त्या बीया फेकून न देता, त्या बीया आमच्या कार्यालयात आणून द्या, किंवा आम्ही तुमच्या घरून घेऊन जाऊ. जेणेकरून गावरान आंब्याची रोपे तयार करण्यास मदत होईल. दरवर्षी हे अधिकारी चार ते पाच हजार रोपे तयार करतात. यावर्षी सुद्धा त्यांनी 7 हजार रोपे ही त्यांच्या कार्यालयाच्या आवारातच तयार केलीय, ते स्वतः त्या रोपांची दररोज काळजी घेतात आणि आंब्याच्या बिया सुद्धा ते सुटीच्या काळात जमा करून आणतात. तर समाजातील इतरही लोकांना त्यांनी आवाहन केले आहे की गावरान आंबा टिकाव यासाठी प्रयत्न करावे, आणि आंब्याच्या बीया आणून द्यावेत.

Published on: May 31, 2023 07:01 AM
Follow Us