“सावरकारंवर बोलणं थांबलं नाहीतर मग महात्मा गांधीची 100 पापं आम्ही समोर आणू”
Ananad Dave : या देशाला दुसरा गोडसे परवडणार नाही. महात्मा गांधी होते म्हणून गोडसे तयार झाले, असं आनंद दवे म्हणालेत. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
पुणे : इथून मागे आम्ही महात्मा गांधी यांच्याबाबत आदर ठेवून होतो. पण सातत्याने सावरकारंविषयी बोललं जातं. हे बोलणं थांबलं नाहीतर मग महात्मा गांधीची 100 पापं आम्ही समोर आणू. फाळणीचा इतिहास समोर आणू. हिंदूंचा झालेला नरसंहार हे सगळं बाहेर काढू. त्याच्याविषयीची पुस्तकंही छापू, असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलेलं आहे. या देशाला दुसरा गोडसे परवडणार नाही, असं आमचं म्हणणं आहे. गांधी होते म्हणून गोडसे तयार झाले. इंदिरा गांधींनी 11 हजारांची देणगी सावरकर प्रतिष्ठानसाठी दिली होती. इंदिरा गांधींचा अभ्यास केला असता तर राहुल गांधींनी मुर्खपणाची वक्तव्य केली नसती, असंही आनंद दवे म्हणालेत.
Published on: Mar 28, 2023 03:28 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

