Sunil Tatkare On Vidhan Parishad | कोकणच्या जागेवर तटकरेंचा डंका! अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार? सुनील तटकरेंची मोठी घोषणा
कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे मैदानात उतरवण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. सुनील तटकरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढत आहे.
कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे मैदानात उतरवण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. सुनील तटकरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढत आहे. महायुतीतील जागावाटपाबाबत निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कोकण विभागातील जागा लढवण्याचे निश्चित केले आहे. अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे उमेदवार म्हणून दाखल करण्यात येत असून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी कोकणातील महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे पाठबळ अनिकेत तटकरे यांना असल्याचा दावा केला. उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले यांच्यासह महायुतीतील सर्व आमदार आणि नेते त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरही सर्वांचे लक्ष लागले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून अजूनही तिढा कायम असून आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोघेही या पदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
कोकण विधान परिषद मतदारसंघातील ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात असून अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
Published on: Jun 01, 2026 11:02 AM
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू...

