रमीचा विषय उगाच लांबला..; रमी खेळण्याच्या व्हिडीओवर कोकाटेंचा मोठा खुलासा
कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन रमी खेळण्याच्या व्हायरल व्हिडीओवर खुलासा केला आहे.
हा खूप छोटा विषय होता. तो एवढा का लांबला हे कळालं नाही. मी या आधी देखील याबद्दल खुलासा केला आहे, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हंटलं आहे. विधान भवनाच्या सभागृहात रमी खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावरून राजकारण आता चांगलंच तापलं आहे. त्यावर आज कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा दिला.
यावेळी बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, याबाबत मला एकच सांगायचं आहे की हा इतका छोटा विषय आहे. हा विषय लांबला का कळलं नाही. मी खुलासा केला आहे. ऑनलाइन नंबर काय माहीत आहे का. ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं अटॅच नाही. माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना मी कोर्टात खेचणार आहे
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

