Manikrao Kokate : तो विषय शेतकऱ्यांचा आहे, मात्र.. ; शेतकरी कर्जमाफीवर कृषिमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Manikrao Kokate Statement : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात मोठं विधान केलं आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजेत असं वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे. कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतली, असंही यावेळी कोकाटे यांनी सांगितलं. त्यामुळे यावेळी तरी शेतकऱ्यांच्या पदरी कर्जमाफीच्या एवजी निराशाच पडलेली आहे.
निवडणुकीच्या वेळी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिल्यानंतर मात्र आता कर्जमाफी देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नसल्याने यंदा आणि पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना कोणतीही कर्जमाफी दिली जाणार नसल्याचं सत्ता स्थापनेनंतर सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. त्यावर आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नवीन विधान केलं आहे. शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. योग्य वेळ आल्यावर तो निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवर दिली. यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, ‘तो विषय शेतकऱ्यांचा आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजे असं माझं मत आहे. कर्जमाफी संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असं म्हणत सध्या तरी कर्जमाफी नसल्याचे संकेत कोकाटे यांनी दिलेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

