Breaking | अनिल परबांचा किरीट सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. त्यांनी 100 कोटींचा दावा दाखल केला आहे.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. आपल्यावरील आरोप मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा 100 कोटींचा दावा दाखल करू, अशी नोटीस अनिल परब यांनी सोमय्यांना पाठवली होती. मात्र, 72 तासानंतरही सोमय्यांनी माफी न मागितल्याने अखरे हा दावा दाखल करण्यात आला आहे.

अनिल परब यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे, असं परब यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI