Vaishnavi Hagawane : आणखी एक मोठा पुरावा समोर, वैष्णवीच्या वडिलांकडून 1.5 लाख उकळले, हगवणेंनी मामीच्या नावे…
वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलिसांच्या तपासातून नव-नवी माहिती समोर येत आहे. यातून हगवणे कुटुंबांच्या कारनाम्यांची मालिकाच सुरू असल्याचे उघड होत आहे. अशातच अंजली दमानियांनी खळबळजनक दावा केलाय.
वैष्णवी हगवणे प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. वैष्णवीच्या वडिलांकडून पूनम जालिंदर सुपेकरांच्या नावे १ लाख रूपयांची रक्कम हगवणे यांनी घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वैष्णवी आणि शंशाकच्या लग्नातील रुखवत तुम्ही करू नका, शशांकच्या मामी करतील, असं हगवणे कुटुंबांकडून वैष्णवीच्या माहेरच्यांना सांगण्यात आलं आणि त्याचे एक लाख रूपये वैष्णवीच्या सासरच्यांनी लाटले. दमानिया यांनी ट्वीट करत हा घ्या एक मोठा पुरावा असे म्हणत हा दावा केलाय. वैष्णवीच्या वडिलांकडून १ लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले. तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून १ लाखाचा चेक आणि ५०,००० रोख हे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेच्यांकडून वसूल केले, असे दमानियांनी पुरावा दाखतव सांगितले. तर दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का? असा सवालही त्यांनी केला.
हा घ्या एक मोठा पुरावा.
वैष्णवीच्या वडिलांकडून १००००० रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले.
तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून १ लाखाचा चेक आणि ५०,००० रोख हे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या महेच्यांकडून वसूल केले.
दूरच्या… pic.twitter.com/Xo6QeSa1LC
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 31, 2025
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा

