छगन भुजबळांची नाराजी, भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्…, अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मंत्रिपदावरून भुजबळ नाराज असतानाच अजितदादांनी एक सूचक विधान केलं आहे. आमदार रुसला समजूत काढा असं काही करावं लागणार नाही असं अजित पवार म्हणतायत.
भाजप प्रवेशाचा गेम प्लॅन तर नाही ना? असा खोचक सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे. नाराज झाल्याचं दाखवून छगन भुजबळ भाजप मध्ये प्रवेश करतील असं वाटतंय असं देखील दमानिया यांनी म्हंटलं आहे. तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी दमानिया कोणताही आरोप करतात असा प्रत्युत्तर त्यावर सुरज चव्हाण यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मंत्रिपदावरून भुजबळ नाराज असतानाच अजितदादांनी एक सूचक विधान केलं आहे. आमदार रुसला समजूत काढा असं काही करावं लागणार नाही असं अजित पवार म्हणतायत. भुजबळ फडणवीसांना भेटायला जातात पण अजित पवारांना भेटत नाहीत. भेटीचा राजकीय अर्थ काय घ्यायचा असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. फडणवीसांनी राजकारणासाठी कुणाचा वापर केला नाही असं प्रवीण दरेकर म्हणालेत. जाहीरपणे नाराजी व्यक्त करू नये सर्वांना संघटनेचे पाठ आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नाराज छगन भुजबळ हे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर भुजबळ हे आपली काय भूमिका मांडतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

