Anjali Damania Video : मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
बीड पोलिसांनी 3 महिन्यांनंतर याची दखल घेतली. या प्रकरणात कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळी येथे विधानसभा निवडणुकीदरम्यानच एक मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि त्याला ‘ही होती २०२४ ची विधान सभेची मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक’ असे कॅप्शन दिले होते. मात्र या प्रकरणासंदर्भात आज अंजली दमानिया यांनी आणखी एक ट्वीट करत अखेर ८२ दिवसानंतर गुन्हा दाखल झाला असे म्हणत कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती दिली. विधानसभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाला हे आता स्पष्ट झाले असल्याचे दमानिया यांनी म्हटले तर निवडणूक आयोगाकडे असे २० ते २५ तक्रारीचे व्हिडीओ आहेत. त्यातील प्रत्येक व्हिडीओवर कारवाई करा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. पुढे त्या असेही म्हणाल्यात, परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल आणि ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी बीड जिल्ह्याचे एसपी नवनीत कॉवत यांचे आभारही मानले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी परळी शहरातील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाला होता. शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखले होते. कशाचा बॉडीगार्ड असे म्हणत मध्ये कोणीही जायचे नाही म्हणून अंगरक्षकाला बाहेर काढले होते, तसेच कार्यकर्ते ॲड. माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती. या प्रकरणासंदर्भात आज कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर अंजली दमानिया यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केलीय.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
