बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर ‘त्या’ प्रकरणी गुन्हा दाखल, विधानसभा निवडणुकीच्यावेळी नेमकं काय झालं ?
बीड पोलिसांनी 3 महिन्यांनंतर याची दखल घेतली. या प्रकरणात कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी परळी शहरातील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाला होता. शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखले होते. तसेच कोण पोलीस?, कशाचा बॉडीगार्ड असे म्हणत मध्ये कोणीही जायचे नाही म्हणून अंगरक्षकाला बाहेर काढले होते, तसेच कार्यकर्ते ॲड. माधव जाधव यांनाही मारहाण झाली होती. दादागिरी आणि मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासह अनेकांनी केली केली. अखेर बीड पोलिसांनी 3 महिन्यांनंतर याची दखल घेतली. या प्रकरणात कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याआधीही कैलास फडने हवेत गोळीबार केल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता. याप्रकरणी त्याला यापूर्वी अटक करण्यात आली होती.
Published on: Feb 12, 2025 03:15 PM
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरदा पवारांच्या राष्ट्रवादीतील बड
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
