बँकॉक फ्लाईट… एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट? माजी मंत्र्यांच्या मुलासाठी सूत्र फिरली
एखाद्या नेत्याच्या मुलासाठी यंत्रणा किती वेगाने हलते याची प्रचिती काल माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलासोबतच्या प्रकाराने घडली. मुलगा न सांगता काही लाख रुपये खर्चून स्पेशल विमानाने बँकॉकला निघाला. पुढे काय काय घडलं आणि सावंत यांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप का होतोय?
बडेबडे नेते राजकारणात गेम फिरवतात. पण माजी मंत्री तानाजी सावंत सध्या प्लेन फिरवण्याने चर्चेत आहेत. एरवी तुमची आमची पोरं हरवल्यावर अजगरासारखी निपचित पडलेली यंत्रणा यावेळी मात्र फणा काढलेल्या नागासारखी जागी राहिली. फक्त फोनवरूनच गल्लीपासून दिल्लीची सूत्र फिरली आणि पोरांना बँकॉकच्या दिशेने आकाशात उडवलेलं विमान बापाच्या राजकीय वजनाने अखेर पुन्हा जमिनीवर आलं. घरगुती वादातून किंवा कुटुंबाला नीट माहिती न देता मुलगा बँकॉकच्या वाटेला गेल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुलाने तब्बल 68 लाख रुपये मोजून स्पेशल विमान बुक केलं. विमान उड्डाणानंतर आता जमिनीवरच्या यंत्रणा रोखू शकत नाही अशी ही कल्पना बहुधा मुलाला आली असावी. पण माजी मंत्री इरेला पेटले तर ते हवेतही सत्ता गाजवू शकतात.. याचा अंदाज बहुधा त्यांना आला नव्हता.
नेमकं घडलं काय?
माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषीराज सावंत आणि त्यांचे दोन मित्र थायलंडला निघण्यासाठी कारने पुणे विमानतळावर पोहोचले. ड्रायव्हर तिघांना सोडून घरी परतला. 68 लाख रुपये भाडे मोजलेलं स्पेशल चार्टर्ड विमान सावंत यांच्या चिरंजीव्यांसाठी धावपट्टीवर सज्ज होतं. स्पेशल चार्टर्ड प्लेनने पुण्याहून बँकॉकला उड्डाण केल्यावर माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषीराज सावंत आणि त्यांचे दोघे सहकारी निवांत झाले. शिक्षणाचा माहेरघर सोडून सावंत यांच्या चिरंजीवांचं विमान थायलंडच्या राजधानीकडे झेपावलं. भारतीय भूभाग सोडून विमानाने बंगालच्या खाडीत प्रवेश करताच बहुधा ऋषीराज सावंत आणि सहकाऱ्यांना बँकॉक नजरेच्या टप्प्यात दिसू लागलं होतं. एकीकडे हवेत उडणाऱ्या मुलाला बँकॉकला पोहोचण्याची ओढ लागली होती आणि दुसरीकडे पुण्यात मात्र मुलगा बेपत्ता झाला की काय या शंकेने माजी मंत्री आणि बाप म्हणून तानाजी सावंत यांच्या काळजाची घालमेल सुरु झाली. कारण मी दोन दिवस बाहेर जातोय इतकाच मेसेज करून माजी मंत्री सावंत यांच्या चिरंजीवानी आपला फोन बंद केला. सावंत यांनी लगेच सूत्र हलवून सिंहगड पोलीस ठाण्यात मुलाच्या मिसिंगची तक्रार दिली. नंतर काय घडलं बघा स्पेशल रिपोर्ट

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
