‘एक मेसेज अन् फोन स्विच ऑफ…’, मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता, घरी न सांगता कुठे गेला? मोठ्या मुलानं केला खुलासा
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा सोमवारी दुपारीपासून बेपत्ता झाला होता. त्यासंदर्भात पुण्यात गुन्हा दाखल झाला. घरी न सांगता कुठे गेला? मोठ्या मुलानं केला खुलासा
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हा सोमवारपासून बेपत्ता झाला होता. त्यासंदर्भात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो खासगी विमानाने बँकॉकला गेल्याची माहिती मिळाली आणि रात्री ९ वाजेच्या सुमारास तो घरी परतला. आता या सर्व प्रकरणावर ऋषीराज सावंत याचे बंधू गिरीराज सावंत यांनी खुलासा केलाय. ‘सोमवारी दुपारी ३.३० वाजता ऋषीराजचा मेसेज आला. तो दोन दिवस बाहेर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने फोन स्विचऑफ केला. आम्हाला तो कुठे गेला? कोणाबरोबर गेला? कशासाठी गेला? त्याची काहीच कल्पना नव्हती. वडील या नात्याने तानाजी सावंत चिंताग्रस्त झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. घरात आम्ही रोज कोण कुठे असणार आहे, त्याची माहिती देत असतो. न सांगता कोणीच कुठे जात नाही, त्यामुळे आम्ही पूर्ण कुटुंब टेन्शनमध्ये आलो’, असे गिरीराज सावंत यांनी सांगितले. तर आठ दिवसांपूर्वी ऋषीराज दुबईत व्यावसायिक कामासाठी गेला होता. त्यानंतर आता पुन्हा व्यावसायिक कारणासाठी तो बँकॉकला जायचं होतं. दुबईला आठ दिवस थांबल्यानंतर बँकॉकला घरचे कोणी जावू देणार नाही, असे त्याला वाटले. त्यामुळे भीतीपोटी घरात न सांगता तो गेला. मी दोन दिवस बाहेर जात आहे, असे सांगून ऋषीराज याने फोन बंद केला होता, असे गिरीराज सावंत यांनी म्हटले.

ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला

'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
