Anjali Damania : अंजली दमानियांच्या जीवाला धोका, गेम करण्याची कोणी केली भाषा? अमेरिकेत असताना काय घडलं?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अमेरिकेत असताना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. जीवाला धोका असून गेम करण्याची भाषा वापरल्याचे त्यांनी सांगितले. या धमक्यांना न जुमानता त्या पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून, ३०० कोटींच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच अमेरिकेत असताना आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती दिली. तुमच्या जीवाला धोका आहे, त्यांचा गेम करायचा आहे अशा शब्दांत त्यांना वरिष्ठ सूत्रांकडून कळवण्यात आले होते. जरांगे पाटलांना धमकी आल्या त्याच दिवशी त्यांनाही हा फोन आला होता. या धमक्यांना न जुमानता दमानिया यांनी आता हेड ऑन बॅटल देण्याचा निर्धार केला आहे. त्या कुठलीही सुरक्षा घेणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.
याच मुलाखतीत अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावरच्या जमीन व्यवहार प्रकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पार्थ पवार यांच्या कंपन्या, अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी आणि अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी, यांचे उत्पन्न आणि विक्री शून्य असतानाही त्यांनी ३०० कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी केली, असा मूलभूत प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी

