tv9 marathi Special Report : अजित पवारांसमोरच गोंधळ! मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीत राडा?
कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासमोरच जोरदार राडा झाल्याचे समोर आले. तर बैठकीतच गोंधळ झाल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते.
मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडकरत अजित पवार हे सत्तेत गेले आणि उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापुरात गेले होते. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासमोरच जोरदार राडा झाल्याचे समोर आले. तर बैठकीतच गोंधळ झाल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. तर अजित पवारांनी हात जोडून लोकांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. कोल्हापुरात अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली मात्र ही बैठक गोंधळानं चर्चेत आली. नेमकं काय झालं या बैठकीमध्ये बघुयात त्यावरचा हा TV9चा special report…
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..

