Plane Crash : म्हणून VIDEO काढला पण… विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला…
आर्यन असारी नावाच्या मुलाने या घटनेबद्दल सांगितले की, त्याला वाटले की विमान इतके खाली आहे की त्याला वाटले की ते उतरणार आहे, परंतु ते पडले आणि आग लागली. व्हायरल व्हिडिओची चौकशी करताना स्थानिक पोलिसांनीही आर्यनला गाठले आणि त्याला या दुर्घटनेचा प्रत्यक्षदर्शी मानून त्याचा जबाब नोंदवलाय.
गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर, जेव्हा लोकांनी त्याबद्दल शोध सुरू केला, तेव्हा एक व्हिडिओ समोर आला. तो व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. हा व्हिडिओ एका सतरा वर्षांच्या मुलाने त्याच्या फोनवर रेकॉर्ड केला होता. अहमदाबाद विमान अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ ज्याने नकळत शूट केला तो १७ वर्षीय मुलगा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आर्यन आसरी या नावाच्या मुलाने जो व्हिडीओ काढला तो देशभरात बातम्यांच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल होतोय.
विमान कोसळतानाची घटना आर्यन नावाच्या मुलाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि ज्यावेळी विमान दुर्घटना घडली तेव्हा नेमकं काय घडलं हे संपूर्ण देशाला समजलं. मात्र आता त्याने स्वतःच एका वृत्तसंस्थेला यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली. आर्यनने हा व्हिडीओ शूट का केला? याचे कारण सांगतांना त्याने ज्या दिवशी ही मोठी दुर्घटना घडली तेव्हा नेमकं काय झालं? याबद्दल सारं काही सांगितलं आहे. आर्यन म्हणाला, विमान इतके खाली होते की जणू काही ते उतरणारच होते. मात्र पाहता क्षणी या विमानाचा अचानक आगीचा स्फोट झाला आणि मी घाबरलो. मी पहिल्यांदाच एवढ्या जवळून विमान पाहिलं होतं आणि गावाकडे जाऊन मित्रांना दाखवण्यासाठी विमानाचा व्हिडीओ काढला, असे आर्यनने सांगितले.

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले

'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती

डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ

अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच
