AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plane Crash : ...अन् विमान दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, अपघात शूट करणाऱ्या आर्यनच्या मित्रानं सांगितलं काय घडलं?

Plane Crash : …अन् विमान दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, अपघात शूट करणाऱ्या आर्यनच्या मित्रानं सांगितलं काय घडलं?

Updated on: Jun 14, 2025 | 5:24 PM
Share

शनिवारी, अहमदाबाद पोलिसांनी विमान अपघाताचा व्हिडिओ बनवणाऱ्या १७ वर्षीय आर्यन असारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तथापि, त्याची चौकशी करण्याचे कारण कळू शकलेले नाही. त्याचे घर अहमदाबाद विमानतळ आणि अपघात स्थळाच्या दरम्यान लक्ष्मीनगर परिसरात आहे.

विमान कोसळतानाची घटना आर्यन नावाच्या मुलाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. १७ वर्षीय आर्यनला तपास यंत्रणांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. एअर इंडियाचे विमान एआय-१७१ टेकऑफनंतर ४० सेकंदांनी दोन किलोमीटर अंतरावर सिव्हिल हॉस्पिटलच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. अपघातानंतर आर्यनचा हाच व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

या व्हिडिओवरूनच एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनरचे नेमके काय झाले हे अख्या देशाला कळले. अपघाताच्या वेळी आर्यन छतावर होता. विमान तेथून जातानाचा व्हिडिओ शूट करत होता, परंतु काही सेकंदातच विमान कोसळले. विमान उडत असतानाचा व्हिडीओ आर्यन बनवत होता त्याच क्षणी विमानाचा हा मोठा अपघात झाला. याच आर्यनसोबतच्या मित्राने आणि शेजारच्या एका महिलेने नेमकं काय झालं? याची माहिती दिली आहे.

Plane Crash : एअर इंडियाचं विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, ‘त्या’ प्रवाशानं अपघात होण्यापूर्वी काय केलं होतं ट्विट?

मिळालेल्या माहितीनुसार, एका वृत्तसंस्थेने या आर्यनशी बातचीत केली तेव्हा तो म्हणाला, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी विमान इतक्या जवळून पाहिले. पुढे त्याने असेही सांगितले, माझे वडील या इमारतीत भाड्याने राहतात. मी दुपारी छतावर असताना मला विमानाचा आवाज ऐकू आला आणि मी माझ्या मोबाईलवर त्याचा व्हिडिओ बनवू लागलो. विमान माझ्या डोक्यावरून गेले तेव्हा ते थोडेसे थरथरत होते, पण मला काहीही समजले नाही, कारण विमान इतक्या जवळून मी पहिल्यांदाच पाहत असल्याने मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो. शेवटी व्हिडिओ झूम केला तेव्हा अचानक विमान पुढे गेले आणि कुठेतरी आदळले आणि मोठा स्फोट झाला.

Published on: Jun 14, 2025 05:06 PM