Aryan Khan Drugs Case | बॉलिवूड अभिनेत्रीसोबत आर्यनच्या ‘नशा-पाण्याच्या’ गप्पा, NCB च्या हाती चॅटिंग

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामिनावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज (Mumbai Goa Cruise Drugs Party) प्रकरणात अडकलेल्या आर्यनचा जामीन अर्ज गेल्या अनेक दिवसांपासून पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलला जात होता.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामिनावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई क्रुझ ड्रग्ज (Mumbai Goa Cruise Drugs Party) प्रकरणात अडकलेल्या आर्यनचा जामीन अर्ज गेल्या अनेक दिवसांपासून पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलला जात होता. 14 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात न्यायाधीशांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे आज याचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनडीपीएसचे विशेष न्यायालय आज (बुधवारी 20 ऑक्टोबर) निकाल देणार आहे. आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांनी जामीन अर्जावर आपला आदेश राखून ठेवला होता.

उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीसोबत नशेबद्दल चॅटिंग

दरम्यान, क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानचे एका उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीसोबत झालेले चॅटिंग देखील एनसीबीच्या हाती लागल्याची माहिती ‘आज तक’ने दिली आहे. गप्पांमध्ये नशेबद्दल चर्चा झाल्याची माहिती. एनसीबी टीमने न्यायालयाला दिलेल्या आरोपींच्या चॅटमध्ये आर्यनसोबत या अभिनेत्रीच्या गप्पांचाही समावेश आहे. याशिवाय, काही ड्रग पेडलरशी झालेल्या आर्यनच्या गप्पाही न्यायालयाच्या हाती लागल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI