Ashish Shelar | मविआ सरकार पुत्र, पुत्री आणि पुतण्याभोवती फिरणारं आहे- आशिष शेलार
'काही वर्षांपूर्वी तीन पैशांचा तमाशा असं नाटक प्रसिद्ध होतं. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा असंच आहे. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवती केंद्रित झालेलं आहे. ही वेदना आम्ही मांडतो आहे', अशा शब्दात आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळे सरकारमधील नेत्यांनी सरकारच्या कामाची जंत्री सादर करायला सुरुवात केली आहे. तर भाजपकडून सरकारच्या कामाचा पंचनामा सुरू आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकार म्हणजे अहंकार… अहंकार… अहंकार असलेलं सरकार आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही. तसेच आज कोणता आरोप अथवा टीका ही करायचा नाही. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे. असंख्य वेदना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या दोन वर्षापासून भोगाव्या लागल्या. त्या मांडत आहोत. काही वर्षांपूर्वी तीन पैशांचा तमाशा असं नाटक प्रसिद्ध होतं. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा असंच आहे. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवती केंद्रित झालेलं आहे. ही वेदना आम्ही मांडतो आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..

