Ashish Shelar | माहिती लपवण्याचे कारण काय?याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे : नवाब मलिक
लपवालपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या दोघांची नार्कोटेस्ट करावी, असंही आशिष शेलार म्हणाले.
एनसीबीनं ड्रग्जच्या विरोधात बिनतोड कारवाई केली पाहिजे. यात कुणाचाही मुलाहिजा ठेवण्याची गरज नाही ही भाजपची भूमिका आहे. विरोधकांनी विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला तरी ड्रग्ज, गांजा, चरस आणि हर्बल तंबाखू जे दोन ग्रॅम असलं तरी कारवाई करावी, ही आमची भूमिका आहे. गेल्या दहा पंधरा दिवसानंतर म्हणजेच आर्यन खानला अटक झाल्यानंतर नवाब मलिक जी माहिती देत आहेत. ती माहिती आर्यन खानला अटक झाल्यानंतरची माहिती सर्वसाधारण आहे. नवाब मलिक यांनी काढलेले कपड्याचे मुद्दे असतील, त्यांचे ड्रेसेस असतील. प्रायव्हेट आर्मी असेल ही माहिती नवाब मलिक यांना असेल तर ती माहिती गुप्त का ठेवली. नवाब मलिक हे सर्वसाधारण माहिती देत आहेत. तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय?याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे, असं आशिष शेलार म्हणाले. या सर्व लपवालपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या दोघांची नार्कोटेस्ट करावी, असंही आशिष शेलार म्हणाले.
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग

