VIDEO : Ashok Chavan | ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्यांवर अशोक चव्हाणांचं ट्वीट, राजकीय वर्तुळात चर्चा

अशोक चव्हाण यांनी नुकताच एक ट्विट केलं आहे. सोबत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात विलासराव काँग्रेसचं वर्णन करताना दिसत आहेत. काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

अशोक चव्हाण यांनी नुकताच एक ट्विट केलं आहे. सोबत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात विलासराव काँग्रेसचं वर्णन करताना दिसत आहेत. काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. अलिकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली, असंही चव्हाण यांनी नमूद केलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI