Ashok Kharat Case | भोंदू बाबा अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा निधी?
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. खरात यांच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारच्या काळात 2018 साली यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला होता.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. खरात यांच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारच्या काळात 2018 साली यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला होता. त्या वेळी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून या मंदिरासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या निधीतून सभामंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवणे, चेंजिंग रूम, भक्तनिवास उभारणी, विद्युतीकरण तसेच परिसराचे सुशोभीकरण (लँडस्केपिंग) करण्याची कामे प्रस्तावित होती. दरम्यान, भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात या नव्या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. येत्या काळात या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Mar 25, 2026 04:46 PM
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो

