Ashok Kharat | मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कारवाई
भोंदूबाबा खरात याच्या आर्थिक साम्राज्याचे धागेदोरे आता अधिक गडद होऊ लागले आहेत. अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केले. गृहस्थांना, व्यापाऱ्यांनाही गंडवले. त्याचे कारनामे एकानंतर एक बाहेर येताना त्याला मदत करणाऱ्यांची नावेही समोर येत आहेत.

या प्रकरणासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भोंदू खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यावर नक्कीच कारवाई होईल. आता आमच्याकडे अंतिम रिपोर्ट येणार आहे, एकदा का तो आल्यानंतर कडक कारवाई करणार. या प्रकरणात आणखी कोणी आमच्या खात्याचं असेल तर आम्हाला पाठवा इतर खात्यांचं असेल तरीही पाठवा. सगळ्यांवर एसआयटीची करडी नजर असेल.
कोणीही नागरिक असो; ज्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती असेल, त्यांनी ती कर्तव्य म्हणून एसआयटी किंवा नाशिक पोलिसांकडे द्यावी, जेणेकरून तपासाला मदत होईल, असेही आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री कार्यालय अत्यंत संवेदनशीलतेने व गंभीरपणे या प्रकरणाकडे बघत आहे. एसआयटीला तपासाकरिता संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत; यामुळे या प्रकरणात कोणीही दोषी सुटणार नाही, असा विश्वासही बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केला.
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे