Ashok Kharat Case | समता पतसंस्थेत माझ्या…, तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकारांच्या बहिणीची कसून चौकशी केल्याचं समोर आलं आहे. या आठ तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?
सध्या अशोक खरातच्या फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केला इतकेच नाही तर व्यापाऱ्यांनाही गंडवलं. अनेक बड्या लोकांशी मिळून त्याने शेतकऱ्यांच्या जमीनदेखील गंडवून खरेदी केल्याचा देखील आरोप आहे. या प्रकरणातच रुपाली चाकणकारांच्या बहिणीची कसून चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे,
आज रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी केल्याचं समोर आलं आहे. प्रतिभा चाकणकर हिची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. प्रतिभा चाकणकरांच्या नावावर असलेल्या खात्यांमध्ये भोंदू खरात नॉमिनी असल्याचं उघडकीस आलं होतं. यासंदर्भातच चाकणकरांची चौकशी केली होती. चौकशीनंतर त्या म्हणाल्या, खरातच्या पतसंस्थेत आमच्या सह्या नाहीत एकही रुपयाची उलाढाल नाही.’
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के

