AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat | भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000... कोर्टात नेमकं काय घडतंय?

Ashok Kharat | भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000… कोर्टात नेमकं काय घडतंय?

| Updated on: Jul 18, 2026 | 12:20 PM
Share

भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अशोक खरात याने अनेक महिलांना तंत्रमंत्राच्या तसेच भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून रग्गड मालमत्ता जमवली होती. इतकेच नाही तर त्याने अनेक व्यापाऱ्यांना देखील लुबाडलं होतं. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अशोक खरात याने अनेक महिलांना तंत्रमंत्राच्या तसेच भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून रग्गड मालमत्ता जमवली होती. इतकेच नाही तर त्याने अनेक व्यापाऱ्यांना देखील लुबाडलं होतं. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ED ने विशेष न्यायालयात तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अशोक खरात याने भक्तांची फसवणूक करून 42.88 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आर्थिक व्यवहारांबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे जोडल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपपत्रानुसार, अशोक खरातनं वेगवेगळ्या मार्गाने पैसे गोळा केले आणि त्यासाठी 142 बनावट बँक खाती वापरल्याचा दावा ED ने केला आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगसह इतर आर्थिक गैरव्यवहारांचाही उल्लेख करण्यात आला आहे. तपासादरम्यान अनेक व्यवहारांची कागदपत्रे आणि आर्थिक नोंदी तपासण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचा देखील आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ED ने आतापर्यंत 19.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपपत्रात महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील दाव्यांचाही उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Published on: Jul 18, 2026 12:20 PM

Follow Us