Satara | साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी फरार
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर 376 कलमान्वये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे.
सातारा : काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. सातारा शहरातील एका उपनगरात एका 12 च्या वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील काकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी नराधम काका दिली होती. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब उघडकीस आली. याबाबत मुलीच्या पालकांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर 376 कलमान्वये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून फरार आरोपी काकाचाही कसून शोध घेत आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
