ATS Raid : प्रत्येक घरासमोर तगडा बंदोबस्त, एटीएसच्या 20 ते 25 गाड्या; बोरिवली गावात मोठी कारवाई
ATS raid Borivali Bhiwandi : भिवंडी येथे असलेल्या बोरिवली गावात आज एटीएसने छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे, या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
भिवंडीच्या बोरिवली गावात एटीएसने मोठी कारवाई केलेली आहे. एटीएसने 8 ते 10 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सध्या बोरिवली गावात 450 ते 500 पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. एटीएसच्या 20 ते 25 गाड्या सध्या या गावात आहेत. बोरिवली गावात दहशतवादी हालचालींचा संशय एटीएसला आहे. साकीब नाचन आणि दहशतवाद्यांचा तळ अशी बोरिवली गावाची ओळख आहे.
भिवंडीच्या बोरिवली गावात रात्रीपासूनच पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सध्या या गावात जिथे नजर जाईल त्य प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळत आहे. त्यानंतर जवळपास 20 ते 25 गाड्यांमधून एटीएसचे वेगवेगळे अधिकारी या ठिकाणी आले. सद्यस्थितीत येथे साडेचारशे ते पाचशे पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असून प्रत्येक घरासमोर पोलिस कर्मचारी खुर्च्या टाकून बसलेले दिसत आहे. हे सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

