AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा

नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा

| Updated on: Aug 14, 2026 | 10:42 AM
Share

सुखबीर सिंग बादल यांच्यासाठी रुग्णालयामध्ये क्यूआरटी तैनात करण्यात आलेली आहे. नांदेडमधील रुग्णालय आणि बाहेर जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आलेलं आहे. हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती उपचार सुरु आहेत. सुखबीर सिंग बादल यांच्यासाठी रुग्णालयामध्ये क्यूआरटी तैनात करण्यात आलेली आहे. जलद प्रतिसाद पथक हे तैनात करण्यात आलेला आहे. हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल […]

सुखबीर सिंग बादल यांच्यासाठी रुग्णालयामध्ये क्यूआरटी तैनात करण्यात आलेली आहे. नांदेडमधील रुग्णालय आणि बाहेर जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आलेलं आहे. हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती उपचार सुरु आहेत. सुखबीर सिंग बादल यांच्यासाठी रुग्णालयामध्ये क्यूआरटी तैनात करण्यात आलेली आहे. जलद प्रतिसाद पथक हे तैनात करण्यात आलेला आहे. हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री बादल यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत आणि त्याच रुग्णालयाच्या बाहेर आता जलद प्रतिसाद पथक हे तैनात करण्यात आलेला आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावरती कालच नांदेड या ठिकाणी हल्ला झाला होता. त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. आणि त्याच अनुषंगाने ज्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरु आहेत त्या रुग्णालयाच्या बाहेर जलद प्रतिसाद दल हे जवानाचे खरं तर हे सगळे जवान तैनात करण्यात आलेले आहेत.

क्यूआरटी तैनात करण्यात आलेली आहे. ही सुरक्षा आहे आणि या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये सध्या आता चोख बंदोबस्त आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी विरोधी पथकानं तपास सुरु केलाय. एटीएसने आरोपी निहंग जसपाल सिंग याच्या पुण्यातील घरी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड साहेब गुरुद्वारात निहंग जसपाल सिंग याने सुखबीर सिंग बादल यांच्यावर किरपानने हल्ला केला. सुखबीर सिंग बादल, पत्नी आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह गुरुद्वारात आले होते. गुरुद्वारात आल्यानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हातावर आणि खांद्यावर वार केला. याचवेळी बादल यांच्या सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून हल्लेखोर जसपाल सिंगला बाजूला केलं. आरोपी जसपालला पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र या हल्ल्याचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये. घटनेची माहिती घेत मुख्यमंत्री फडणवीसांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एटीएसनेही तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी जसपाल सिंग पुण्यातील सोलापूर बाजार लष्कर भागात वास्तव्याला होता. तो गेल्या दोन वर्षांपासून नांदेडच्या गुरुद्वारमध्ये सेवादारा म्हणून धार्मिक सेवा देत होता. जसपाल सिंग पेशाने वकील. गरजू व्यक्तींना मदत करत असे अशी स्थानिकांची माहिती आहे. दोन ते तीन वर्षांपासून आरोपी आणि त्याची पत्नी नांदेडला वास्तव्यास गेल्याची माहिती आहे. मुलीचं लग्न झाल्यानं तीन वर्षांपासून पुण्यातील घरामध्ये कोणीही वास्तव्यास नाहीये. एटीएसचं एक पथक जसपाल सिंगच्या पुण्यातील घरी येऊन गेल्याची माहिती आहे.

Published on: Aug 14, 2026 10:42 AM

Follow Us