AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | राज्यातील सर्वांना दोन व्हॅक्सिन देण्याचा प्रयत्न : अजित पवार

Ajit Pawar | राज्यातील सर्वांना दोन व्हॅक्सिन देण्याचा प्रयत्न : अजित पवार

| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 12:41 PM
Share

अजित पवारांनी नाशिक दौऱ्यात रस्ते निर्मितीच्या कामांचं भूमिपूजन केलं. नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघात 51 कोटी रुपयांच्या रस्ते निर्मिती कामांचं भूमिपूजन करुन अजित पवार यांनी कुदळ मारली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सरोज अहिरे, दिलीप बनकर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

“आपल्या राज्यातील सर्व व्यक्तींना दोन लसी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हाफकिनमध्ये व्हॅक्सिन तयार करण्याचा अधिवेशनात प्रस्ताव देणार आहे. जिल्ह्याने 7 आमदार दिले. पुढे त्यात आणखी वाढ करायची आहे. पश्चिमकडे पडणारे काम इकडे वळवून आणण्याचं काम भुजबळांनी केलं आहे. सगळ्याचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.