Aurangabad | पुराच्या पाण्यात वाहून जाणारी गाडी वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि परिसराला मुसळधार पावसाचा (Heavy rain in Aurangabad) फटका बसत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या पूलांवरून पाणी वाहत आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि परिसराला मुसळधार पावसाचा (Heavy rain in Aurangabad) फटका बसत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांना जोडणाऱ्या पूलांवरून पाणी पाहत आहे. औरंगाबादेतील गारज गावातही (Garaj village) अशीच एक घटना घडली. पूलावरून वाहणाऱ्या पाण्यातून बाईक नेताना एक बाईकस्वार पाण्यात वाहून गेला. मात्र त्याला वाचवण्यासाठी अवघा गाव एकवटला आणि जेसीबीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात (Rescue operation ) आले.
सततच्या अतिवृष्टीमुळे ढेकू नदीवरील पूलावरून पाणी जात आहे. जीवनावश्यक कामे करण्यासाठी नागरिकांना येथून ये-जा करावी लागते. शुक्रवारी असाच एक बाइकस्वार या पुलावरून जात होता. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे बाइकसहीत तो पाण्यात पडला. हे गारज गावातील अनेक नागरिक त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागले. मात्र बाइकमध्ये अडकल्याने या नागरिकाला बाहेर काढता येत नव्हते.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

