परप्रांतियांच्या नोंदणीवरुन अतुल भातखळकर आक्रमक, मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार

परप्रांतियांच्या नोंदणीवरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 153 अ अन्व्ये गुन्हा दाखल करणार आहेत.

परप्रांतियांच्या नोंदणीवरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 153 अ अन्व्ये गुन्हा दाखल करणार आहेत. परप्रातियांच्या नोंदणीवरुन अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न असल्याचा दावा करत अतुल भातखळकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी एक व्हिडीओ प्रसारीत करुन म्हटलं आहे. मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं भातखळकर म्हणाले. शिवसेना मतदानाच्या वेळी परप्रातियांच्या मतांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करते, अशी टीका देखील भातखळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

 

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI