Aurangabad Flood | पुराच्या पाण्यामुळे औरंगाबादेतील अंजना नदीवरील पुलाचा चेंदामेंदा, 5 गावांचा संपर्क तुटला

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील नदीवरील पुलाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या पुलाचा चेंदामेंदा झाल्यामुळे उपळी भराडी पळशी यासह चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील नदीवरील पुलाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या पुलाचा चेंदामेंदा झाल्यामुळे उपळी भराडी पळशी यासह चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिल्लोड तालुक्यातील अंजना नदीला तुफान पूर आला होता. या पुरात पूल तुटल्याच स्पष्ट दिसत होतं मात्र पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुलाचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचं समोर आलं आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे या पुलाची दुरुस्ती तातडीनं करावी अशी मागणी केली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये मराठवाड्याला पावसानं अक्षरक्ष झोडपून काढलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI