मरणानंतरही यातना संपेनात, औरंगाबादच्या पैठणमधील ब्राम्हणगावात अँम्ब्युलन्समधून मतृदेह नेताना गावकरी बेजार

पैठण पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राम्हणगाव या गावातील एकनाथ जाधव या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा मृतदेह गावात आणण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मृतदेह घेऊन आलेल्या एम्ब्युलन्स वाहनाला नदी नाले आणि ओढ्यातून खडतर प्रवास करावा लागला आहे.

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ब्राम्हणगाव तांडा या गावाला रस्ताच नसल्यामुळे मृतदेह पोचवण्यासाठी एका अँम्ब्युलन्समधूनगाडीला ओढ्या नाल्यातून खडतर प्रवास करावा लागला आहे. पैठण पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्राम्हणगाव या गावातील एकनाथ जाधव या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा मृतदेह गावात आणण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मृतदेह घेऊन आलेल्या एम्ब्युलन्स वाहनाला नदी नाले आणि ओढ्यातून खडतर प्रवास करावा लागला आहे. ही अँम्ब्युलन्समधून गाडी गावांपर्यंत पोचवण्यासाठी संपूर्ण गावाला बेजार व्हावं लागलं आहे. एक अंत्यविधी करण्यासाठी संपूर्ण गावाला मरण यातना भोगाव्या लागल्या आहेत त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI