Aurangabad rain : अजिंठा लेणी परिसरातील सातकुंड धबधबा कोसळला
प्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस झाला. सलग दोन दिवस या परिसरात तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अजिंठा लेणीवरील सातकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. अजिंठा लेणीसमोर असणाऱ्या वाघूर नदीला पूर आला आहे. काल दिवसभर इथे तुफान पाऊस होता.
औरंगाबाद : प्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात जोरदार पाऊस झाला. सलग दोन दिवस या परिसरात तुफान पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अजिंठा लेणीवरील सातकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. अजिंठा लेणीसमोर असणाऱ्या वाघूर नदीला पूर आला आहे. काल दिवसभर इथे तुफान पाऊस होता. अजिंठा आणि परिसरातील शेतकऱ्यांचेही नुकसान झालं आहे. दरम्यान औरंगाबादसह मराठवाड्याला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लासुर परिसरात शिवना नदीला तुफान पूर आला. नदीला आलेल्या पुरामुळे नागपूर मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद झाली. लासुर गावातील दाक्षायनी मंदिरात पाणी घुसले. नागपूर मुंबई महामार्गावरून अजूनही पाणी सुरूच आहे.
Published on: Sep 08, 2021 08:37 AM
Latest Videos
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा

