औरंगाबादेत शिवना नदीच्या पाणीपातळीत वाढ; लासूर-गंगापूर शहरांचा संपर्क तुटला

औरंगाबाद जिल्ह्यात शिवना नदीला पूर आला आहे. शिवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नदीवरील अनेक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गंगापूर आणि लासूर शहरांचा संपर्क तुटलाय.

औरंगाबाद जिल्ह्यात शिवना नदीला पूर आला आहे. शिवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे नदीवरील अनेक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गंगापूर आणि लासूर शहरांचा संपर्क तुटलाय. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांच्या घरात पाणी देखील शिरलं आहे. नदीवरील अनेक पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शिवना नदीला पूर आल्यानं प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलं आहे. तर, सातारा परिसरातील बीड बायपास रोडवरचे रात्रीचे हे दृश्य. अनेक ठिकाणू मूळ ओढ्याचे, नाल्याचे स्रोत अडवले गेल्यामुळे नैसर्गिकरित्या वाहून जाणारे पाणी येथे अडवले गेले आहे. त्यामुळे सातारा-देवळाई परिसरात अशी पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. आधीच रस्तेदुरुस्तीच्या कामांना लागणाऱ्या विलंबाने त्रस्त असलेल्या या परिसरातील नागरिकांना कालच्या पावसाने घराबाहेर कसे पडायचे, हाच प्रश्न सतावत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI