भिवंडीत घराच्या समोर पार्क केलेली रिक्षा चोरीला, घटना सीसीटीव्हीत कैद
भिवंडीच्या ग्रामीण भागातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना तालुक्यातील वज्रेश्वरीमधून समोर आली आहे. घरासमोर लावलेली रिक्षा मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे.
ठाणे : भिवंडीच्या ग्रामीण भागातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना तालुक्यातील वज्रेश्वरीमधून समोर आली आहे. घरासमोर लावलेली रिक्षा मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वज्रेश्वरीमधून राजू पाटील यांच्या मालिकीची रिक्षा चोरीला गेली आहे. त्यांनी रात्री आपली रिक्षा क्रमांक MH 04 KA 0559 ही घरासमोर पार्क केली होती. परंतु रात्री दीडच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी घरासमोरून रिक्षा ढकलत नेली. राजू पाटील यांच्या घराच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...

