रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परिवहन विभागाचा निर्णय आहे. चालकांना मराठी संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. नियमांच पालन न केल्यास कारवाईची शक्यता कायम आहे. परिवहन विभागाकडून लवकरच अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी होणार आहेत. रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली […]
रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. परिवहन विभागाचा निर्णय आहे. चालकांना मराठी संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. नियमांच पालन न केल्यास कारवाईची शक्यता कायम आहे. परिवहन विभागाकडून लवकरच अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी होणार आहेत.
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ.
गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देते. गिरीश.
नक्कीच विशाखा, आपण पाहतोय राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आता आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन विभागाकडून मिळते आणि मराठी भाषा सक्तीच्या नियमाच्या अंमलबजावणीसाठी ही अतिरिक्त मुदतवाढ देण्याचा जो निर्णय आहे तो सुद्धा घेण्यात आलेला आहे. चालकांना मराठी भाषणाचं संभाषणचं कौशल्य सुधारण्यासाठी हा वेळ देण्यात येणार आहे आणि यापूर्वी दिलेल्या मुदतीनंतर आता पुन्हा एक महिन्याची सवलत जी आहे ती जाहीर केली जाते आणि नियमांचं पालन न केल्यास पुढील कारवाईची शक्यता देखील कायम आहे असा जो पवित्र आहे तो देखील परिवहन विभागाचा आहे. त्यामुळे कुणीही याला हलक्यात घेऊ नये असा एक जो संदेश आहे तो सुद्धा या माध्यमातून देण्यात येतोय. शहरातील प्रवाशांशी संवाद सुधारण्यासाठी सरकारनं हा उपक्रम हाती घेतलेला आहे. 15 तारखेनंतर कारवाईसाठी विविध पथकं देखील नेमण्यात आलेली आहेत. जे खाजगी कॅप चालक आहेत, ड्रायव्हर आहेत ज्यांच्याकडे बॅचेस नाही आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा जो बडगा आहे तो देखील उगारला जाणार आहे आणि परिवहन विभागाकडून लवकरच याबाबतचं अधिकृत मार्गदर्शन सूचना पत्रक जे आहे ते सुद्धा जाहीर होणार आहे.
धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
राज्यामध्ये लवकरच महा आयडी डिजिटल ओळख क्रमांकाचा उपक्रम राबवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर डिजिटल प्रशासनाला राज्यामध्ये वेग येणार आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच डिजिटल ओळखीच्या माध्यमातून मिळणार आहेत. महा आयडी मध्ये आधार क्रमांकाचा समावेश असणार आहे. हा स्वतंत्र ओळख क्रमांक नसणार आहे.
Published on: Aug 14, 2026 09:11 AM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

